परशुराम उपरकरांना शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या काय समजणार…?

अण्णा कोदे यांचा सवाल: कापड विक्रेत्यांच्या मागणीला
नितेश राणेंनी न्याय दिला…

कणकवली ता.१२-: कणकवली शहरात 17 मतांचा ब्रँड असलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांचे कणकवली शहरासाठी योगदान काय? असा सवाल भाजपा कणकवली शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांनी केला आहे.

अण्णा कोदे म्हणाले,आमचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शहरासाठी केलेल्या कामामुळेच शहरातील जनता त्यांना समस्यां घेऊन भेटायला जाते. व यामुळे कणकवली शहरातील कापड व्यवसायिकांनी आपल्याला न्याय मिळेल म्हणूनच आम. नितेश राणेंची भेट घेतली. व्यापाऱ्यांनी उपरकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. कारण उपरकर हे थेट सेलवाल्याला भेटण्यासाठी प्रयत्न करणार होते. व यासाठी उपरकर यांचे प्रयत्न सुरू होते. पण आमदार नितेश राणेंनी कापड विक्रेत्यांच्या मागणीला न्याय दिला व विक्रेत्यांनी सुद्धा जाहीरपणे हे मान्य केले. कणकवली शहरात 17 मतांचा ब्रँड झालेल्या उपरकर यांनी आपण पत्रकार परिषदा घेऊन त्यानंतर सेल विक्रेता आपल्याजवळ आल्यानंतर भूमिका बदलायची हे आता या शहरातील लोकांना समजायला लागले. माहितीच्या अधिकारात अर्ज करून नंतर सेटलमेंट करणाऱ्यांना कणकवलीतल्या व्यापाऱ्यांची व्यथा काय समजणार, कणकवली शहरातील प्रत्येक विषयाला विरोध करणे हाच उपरकर यांचा अजेंटा असून उपरकर यांनी आतापर्यंत केलेली सर्व आंदोलने ही त्यांच्या फायद्याची आहेत. जनतेशी त्याचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे शहरातील कापड विक्रेत्यांवर अन्याय होत होता. तो दूर नितेश राणेंनी केला. व्यापाऱ्यांना त्याचा फायदा झाला. तर उपरकर यांच्या पोटात का दुखले? असा सवाल
अण्णा कोदे यांनी केला आहे.

You cannot copy content of this page