देवगड तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून शिवराज चव्हाण यांना अज्ञातांकडून त्रास

पोलिस स्थानकात तक्रार देणार असल्याची चव्हाण यांची माहिती

*💫देवगड दि.०४-:* देवगड तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून शिवराज चव्हाण अंगावर अज्ञात व्यक्तिने खाजकुवले टाकण्याची घटना गुरूवारी दुपारी १२.४५ वा सुमारास घडली.या घटनेने महसुल विभागात एकच खळबळ उडाली असून देवगड तालुक्यातील ही पहिलच घटना आहे.हे कृत्य करणारी व्यक्ति ही सराईत व पुर्वनियोजन करून हे कृत्य केले असून संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी पोलिस स्थानकात तक्रार देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगीतले. गुरूवारी देवगड तहसिल कार्यालयात मोठ्या प्रमाणात वर्दळ होती.दरम्यान पुरवठा विभागात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेल्या शिवराज चव्हाण यांच्या टेबलाजवळ आलेल्या अज्ञात इसमांनी ते आपल्या कामात व्यस्त असतानाच पिशवीतून आणलेली खाजकुवले त्यांची मान खाली असतानाच त्यांचा अंगावर टाकून तेथून पळ काढला.दरम्यान खाजकुवले टाकून पसार झालेल्या त्या व्यक्तिचा तहसिल कार्यालयात कामानिमित्त आलेल्या भाजपा तालुकाध्यक्ष संतोष qकजवडेकर आबा तावडे व इतरांनी पाठलाग केला मात्र त्या व्यक्तिने देवगड बीएस्एनएल् कार्यालय असलेल्या मार्गाने पळ काढला.तो मिळाला नाही. खाजकुजले टाकण्याचा प्रकार झाला त्यावेळी पुरवठा विभागात कर्मचाèयांसहीत अनेक नागरिक कामानिमित्त उपस्थित होते.चव्हाण यांच्या अंगावर टाकलेल्या खाजकुवल्यांचा त्रास त्यांच्याबरोबरच पुरवठा विभागातील इतर कर्मचारी व नागरिक यांनाही झाला.चव्हाण यांच्या टेबलाजवळ खाजकुवले पडलेल्या होत्या. घडलेल्या प्रकार चव्हाण यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला. अज्ञात व्यक्तिने कर्मचाèयाचा अंगावर खाजकुवले टाकण्याचा देवगड तालुक्यातील हा पहिलाच प्रकार असून यामुळे महसुल प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्याने सीसीटीव्ही यंत्रणा बसविली नसल्याने त्याचाच \ायदा अज्ञात व्यक्तिने घेतला. ही कृत्य करणारी व्यक्ति ही सराईत गुन्हेगार असून कोणाच्यातरी सांगण्यावरून पुर्वनियोजन करून हे कृत्य केले असावे असा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.याबाबत पोलिस स्थानकात तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

You cannot copy content of this page