*दिवाणी न्यायालयात १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन*

*💫देवगड दि०४-:* देवगड तालुका विधी सेवा समितीच्यावतीने 10 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता येथील दिवाणी न्यायालयात (क. स्तर) राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग- ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली फौजदारी व दिवाणी प्रकरणे, तसेच वीज वितरण कंपनी, दूरसंचार निगम, वित्ताrय संस्था, बँका, ग्रामपंचायत यांनी जास्तीत जास्त प्रकरणे दाखल करून वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी पक्षकारांनी उपस्थित राहून खटले मिटवावेत, असे आवाहन देवगड दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) यांनी केले आहे. 

You cannot copy content of this page