यतीन खोत यांच्या पाठपुराव्यामुळे काम मार्गी
मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील नगरपालिकेच्या वैशिष्टय पूर्ण योजनेतून भरड येथील काजरेकर घर ते प्राइड हॉटेल रस्त्यावरील गटाराच्या काँक्रीटीकरण कामास सुरवात झाली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या पाठपुराव्यातून २०२१-२२ मध्ये या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम मार्गी लागत आहे.
काही दिवसांपूर्वी हे काम सुरू होणार होते. मात्र पावसामुळे हे काम थांबले होते. पावसाने काहीशी उसंत घेतल्यानंतर हे काम मार्गी लागत आहे. अनेक वर्षांपासून भरड भागातील या रस्त्यावर पावसात पाणी साठत होते. साचलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना पावसाळ्यात त्रासाला सामोरे जावे लागत होते. यामुळे याठिकाणी काँक्रीटचे गटार बांधण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी माजी बांधकाम सभापती यतिन खोत यांच्याकडे केली होती. आत हे काम पूर्णत्वास येत असल्यामुळे येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, मंजूर असलेल्या या कामाबाबत आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे यतीन खोत यांनी आभार मानले आहेत.
फोटो –
मालवण शहरातील भरड भागातील गटाराच्या काँक्रीटीकरणाच्या कामास सुरवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
