⚡कणकवली ता.१०-: प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त “शताब्दी संस्मरण अभिवाचन कार्यक्रम” शनिवार १२ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ८ वा. तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ.एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त प्रत्येक महिन्याला एक अभिवाचन कार्यक्रम सादर होणार असून यामध्ये तीन कथा सादर करण्यात येणार आहेत. ऑगस्ट महिन्यात हा दुसरा कार्यक्रम आयोजित करण्याचा बहुमान तळेरे येथील संवाद परिवाराला मिळाला आहे. जी.ए.कुलकर्णी यांच्या प्रत्येक महिन्याला तीन कथांचे अभिवाचन वेगवेगळे तीन अभिवाचक करणार आहेत.
यावेळी जिल्ह्यातील प्रसिद्ध सुत्रसंचालक व कलावंत निलेश पवार, देवी केळूसकर आणि कल्पना मलये ह्या जी.ए.कुलकर्णी यांच्या कथांचे वाचन करणार आहेत.या साहित्यिक कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संवाद परिवाराचे संस्थापक डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.
