⚡दोडामार्ग,ता.१०-: घोटगेवाडीत तिलारी नदीने अखेर मोकळा श्वास घेतला.कोनाळकट्टा आणि घोटगेवाडी गावे जोडणाऱ्या तिलारी नदीवरील कॉजवेच्या पाईपमध्ये मोठमोठी झाडे,लाकडे,कचरा अडकल्याने पाण्याला वाट मिळत नव्हती.साहजिकच पाणी पुलावर येऊन तो मार्ग बंद व्हायचा.त्यामुळे कोनाळचे उपसरपंच रत्नकांत कर्पे यांनी पुढाकार घेऊन दोन्ही गावातील ग्रामस्थांना घेऊन झाडे काढून सिमेंट पाईप खुले केले आणि तिलारीने मोकळा श्वास घेतला.ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाने त्यांच्या जाण्यायेण्याचा रस्ताही खुला झाला.
उपसरपंच रत्नकांत कर्पे यांना कोनाळकट्टा येथील
प्रसन्न पांगम,
दिनेश कर्पे
मंथन कर्पे
श्रेयस राणे
सर्वेश कर्पे
विशाल नांगरे
प्रकाश कर्पे
संतोष वरक
हरेश कर्पे
हेमंत कर्पे
हरीप्रसाद कर्पे
गोपीचंद पांगम व
घोटगेवाडी येथील
सचिन केसरकर
बाळगो केसरकर
परेश धुरी
बालाजी धुरी
अतुल कर्पे
अनिकेत कुडतरकर आदींनी सहकार्य केले.
गावकऱ्यांनी पाईपमधील झाडे काढल्याने झाला घोटगेवाडी- कोनाळकट्टा रस्ता खुला
