ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता सिध्देश तेंडोलकर यांच्याकडून ताडपत्री सुपूर्त
⚡सावंतवाडी ता.१०-: मळगाव आरोग्यवर्धिनी केंद्र इमारत डागडुजीच्या प्रतीक्षेत असून सदर इमारत गळत असून सदर इमारतीवर तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्री घालावी अशी मागणी हरी रावुळ व दत्तात्रय रावुळ (माजी उपसरपंच )यांनी सामाजिक कार्यकर्ते सिदधेश तेंडोलकर यांच्याकडे केली.
सिदधेश तेंडोलकर यांनी तातडीने दखल घेवून ताडपत्री आज सुपूर्द केली. यावेळी आरोग्य अधिकारी कलमीसकर मॅडम, देवयानी रावुळ (माजी सरपंच), सुभाष नाटेकर, हरी रावुळ ,उदय सावल, दत्तात्रय रावुळ ( माजी उपसरपंच ) गुरुनाथ गावकर, सुदेश रावुळ ( बूथ अध्यक्ष),रत्नाकर रावुळ, आदी उपस्थित होते.
