देवबाग हायस्कुलला ग्रामपंचायतीकडून संगणक प्रदान

⚡मालवण ता.०९-:
देवबाग ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून देवबाग मधील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल या प्रशालेसाठी एक संगणक प्रदान करण्यात आला. देवबागचे सरपंच उल्हास तांडेल यांच्या हस्ते हा संगणक प्रशालेला सुपूर्द करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह उपसरपंच श्री.बिलये, ग्रामपंचायत सदस्य हेमंत बांदेकर, सौ. स्कायलेट तांडेल आणि फिल्सू फर्नांडिस आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी सरपंच उल्हास तांडेल यांचा प्रशालेचे ज्येष्ठ लिपिक उदय चोडणेकर यांच्या हस्ते, श्री. बिलये व हेमंत बांदेकर यांचा ज्येष्ठ शिक्षक श्री. गोसावी सर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तर स्कायलेट तांडेल आणि फिल्सू फर्नांडिस यांचा मुख्याध्यापिका सौ. खोबरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ. खोबरेकर यांनी संगणकाचा वापर मुलांना संगणकीय ज्ञान देण्यासाठी केला जाईल, असे आश्वासन देत ग्रामपंचायतीचे आभार मानले. तसेच मुलांसाठी बास्केटबॉल आणि क्रिकेट मैदानाची खेळपट्टी, लॅपटॉप, ई- लर्निंग सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्टर आवश्यक असल्याचेही यावेळी सौ. खोबरेकर यांनी सरपंच तांडेल यांना सांगितल. यावर तांडेल यांनी दि. २ ऑक्टोबर रोजी प्रशालेची लॅपटॉप आणि प्रोजेक्टर ही मागणी पूर्ण करण्याचा शब्द देत आणि पुढच्या आर्थिक तरतूदी मध्ये प्रशालेसाठी एखादे मैदान निश्चित बनवून देण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे कनिष्ठ लिपिक रुपेश खोबरेकर यांनी केले तर आभार श्री. गोसावी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page