सावंतवाडी
तालुक्यातील कलंबिस्त घणशेळवाडी येथील भास्कर भोजू सावंत वय 60 या इसमाने राहत्या घरातील गॅलरीमध्ये छप्पराच्या लोखंडी राॅडला गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला याबाबत पुतण्या अनिल शंकर सावंत राहणार कलंबिस्त यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की मयत भास्कर सावंत हे गेली 30 वर्ष मानसिक वेदना होते त्यांच्यावर सावंतवाडी येथील हॉस्पिटलमध्ये औषध उपचार सुरू होते आजारपणाला कंटाळल्याने त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला दरम्यान येथील पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.
