⚡बांदा ता.०९-: भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस असलेला ९ ऑगस्ट क्रांतिदिन तसेच जागतिक आदिवासी दिन जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या वेळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात योगदान देणारे नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या दिवसाच्या निमित्ताने शाळेतील गौरव घोगळे, शुभ्रा तेली, राघवी महाले,शौर्य तुळसकर,रुद्र तुळसकर आदि विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकांच्या लक्षवेधी वेशभूषा साकारलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी क्रांतिदिना बद्दल आपले विचार भाषणातून व्यक्त केले.यावेळी इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी गटात देशभक्तीपर समुहगीतांचे सादरीकरण केले.
यावेळी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत पंचप्रण शपथ घेऊन मेरी माटी मेरा देश ह उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांनी देखील समुहगीताचे सादरीकरण केले.कार्यक्रम यशस्वी करणेसाठी विद्यार्थी व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
