बांद्यात शनिवारी  रक्तदान शिबिर

⚡बांदा ता.०९-: बांद्याचा बाप्पा या नावाने सर्वत्र  प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर ,बांदा च्या वतीने बांदा  येथे शनिवार दि.12 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ,सिंधुदुर्ग (शाखा – सावंतवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने या लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंडळाने या आधी तीन वर्षे उत्स्फुर्त सहभागाने रक्तदान शिबीर यशस्वी केले  असून यंदाचे आयोजनाचे चौथे वर्ष आहे. दरवर्षी मंडळाचे सर्व कार्यकर्ते,व्यापारी ग्रामस्थ, महिला शेकडोंच्या संख्येने या शिबिरात सहभागी होतात.

12 ऑगस्ट रोजी

बांदा व्यापारी भुवन येथिल श्री विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत हे शिबिर होणार आहे.सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करुन हे शिबिर यशस्वी करावे असे आवाहन मंडऴाच्या वतीने अध्यक्ष अनय स्वार ,उपाध्यक्ष आबा धारगळकर व शिबिर संपर्क प्रमुख अक्षय मयेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page