रुपेश राऊळ ;खत वाटप कार्यक्रमात टिका..
⚡सावंतवाडी ता.०६-: केसरकारांनी सांगितलेली वेळ व दिलेला शब्द हा कधीच पाळला नाही. ही त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्रात आहे, असा जोरदार हल्लाबोल रुपेश राऊळ यांनी आज येथे केला. दरम्यान आपल्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी केसरकर हे किती धावतात, हे आपल्याला देखील ठाऊक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांची जागा तुम्ही दाखवून द्या असे आवाहन देखील त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना केले. ते माजगाव येथे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमानिमित्त आयोजित खत वाटप कार्यक्रमात बोलताना केले.
यावेळी ते बोलताना म्हणाले की आज राज्यात काय हुकूमशाही चाललीय हे उभा महाराष्ट्र पाहत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जर तुम्हाला सरकारच्या तिजोरीची चावी कोणाच्या हातात द्यायची हे तुमच्या हातात आहे, असे उपस्थित शेतकऱ्यांना बोलताना म्हणाले. दरम्यान बांदा परिसरात आलेली पूर परिस्थिती अद्याप दोन वर्षांपूर्वीची नुकसान भरपाई मिळाली नाही. मात्र बाजूचा मतदारसंघ असलेला वैभव नाईक यांच्या मतदारसंघात मिळाली. मात्र आता केसरकर पत्रकार परिषद घेऊन नुकसान भरपाई मिळणार असं, जाहीर केले आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
