सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्षपदी श्रीराम शिरसाट

⚡कुडाळ ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्षपदी श्रीराम शिरसाट यांची वर्णी लागली आहे.
आज सायंकाळी अनंत मुक्ताई हॉटेल, कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची तातडीची सभा पार पडली. या सभेत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली आणि एक मताने निर्णय घेतले गेले. या सभेत वीज ग्राहक संघटनेचा अध्यक्षपदी युवा उद्योजक श्रीराम शिरसाट यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
या सभेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने सर्व आठही तालुक्यातील विजेसंदर्भातील समस्या समजून घेणे तसेच या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी तालुकानिहाय कार्यकारिणी गठीत करणे, ग्राहक मेळाव्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेणे, जिल्ह्यातील विविध भागातील वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

You cannot copy content of this page