वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता पदी डॉ सुनीता रामानंद…

डॉ प्रकाश गुरव यांची कोल्हापूर येथे बदली

सिधुदुर्गनगरी ता ५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदूर्ग अधिष्ठाता पदी डॅा. सुनिता रामानंद यांनी पदभार स्वीकारला, मावळेते अधिष्ठाता डॅा.प्रकाश गुरव यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोल्हापूर येथे अधिष्ठाता पदी बदली झाली आहे.

डॉ. सुनिता रामानंद ह्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मिरज येथून एम. बी. बी. एस व एम. डी. औषधशास्त्र ह्या पदव्या प्राप्त केल्या आहेत.तद्नंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मिरज येथून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामधून व पि.एच. डि.औषधशास्त्र ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली.याशिवाय त्यांनी शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथून एम. ए. इतिहास तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ,नवी दिल्ली, येथून एम. ए. लोकप्रशासन या पदव्याही संपादन केल्या आहेत. उच्चविद्याविभूषित डॉ.सुनिता रामानंद यांना ३० वर्षे पदवी व पदव्युत्तर अध्यापनाचा व प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे.संशोधन क्षेत्रातही त्यांनी मोलाची कामगिरी केली असुन त्यांचे वैद्यकशास्त्रात २५ आंतरराष्ट्रीय व १५ राष्ट्रीय असे एकूण ४० शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत.कोविड काळात कोव्हॅक्सीन लसीच्या भारतात झालेल्या २६ केंद्रांवरील चाचण्यांपैकी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय,कोल्हापूर हे एक प्रमुख केंद्र होते व याच्या प्रमुख संशोधक डॉ. सुनिता रामानंद ह्या होत्या. राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर या संस्थेच्या उभारणीत सन २००१ ते २००८ साली डॉ रामानंद ह्यांनी महत्वाची कामगिरी बजावली होती. आता त्यांनी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

You cannot copy content of this page