⚡वेंगुर्ला ता.०५-: उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना व शाळा संस्थेस क्रीडा क्षेत्रात भरघोस यश मिळवून देणारे क्रीडाप्रेमी, शिस्तप्रिय, विज्ञाननिष्ठ, सामाजिक कार्यकर्ता व साहित्य – सांस्कृतिक क्षेत्रात लौकिकप्राप्त क्रीडाशिक्षक अनिल गोवेकर हे नियत वयोमानानुसार काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. यावेळी झालेल्या सत्कारावेळी त्यांनी क्रीडासाहित्य देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी कॅरम बोर्डस, बुद्धिबळ सेटस, बॅट व विविध प्रकारचे चेंडू असे एकूण किमतीचे १२ हजार ५०० रुपयांचे क्रीडा साहित्य स्कूलला प्रदान केले.
या दातृत्वाबद्दल मुख्यध्यापक उमेश वाळवेकर, चेअरमन विरेंद्र कामत-आडारकर, सेक्रेटरी रमेश नरसुले, संस्था कार्यकारिणी सदस्य, पालक - शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समिती यांनी अनिल गोवेकर यांचे आभार मानले.
फोटोओळी – सेवानिवृत्त शिक्षक अनिल गोवेकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलला क्रीडा साहित्य प्रदान केले
