मळगाव येथे उद्या “आशिर्वाद गुरुमाऊलींचा कार्यक्रम…

जगदंब संगीत विद्यालयाच्यावतीने आयोजन

⚡सावंतवाडी ता.०५ सहदेव राऊळ : उद्या रविवार ६ ऑगस्ट रोजी दुपारी १:३० वाजता खानोलकर मंगल कार्यालय (मालक सुधीर भागवत) येथे जगदंब संगीत विद्यालयाचा (संचालक गुरूवर्य रूपेश पोवार) ‘आशिर्वाद गुरूमाऊलीचा’ कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमात विद्यालयाच्या मुलांचे पखवाज, तबला सोलो वादन, भजन वादन होणार आहे. या कार्यक्रमास सिंधुदुर्गातील भजन दशावतार आणि डबलबारी क्षेत्रातील सुप्रसिध्द कलाकारांची उपस्थिती व गायन वादन असणार आहे. तरी या कार्यक्रमात सर्वानी आपली उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन सुधीर राऊळ आणि जगदंब संगीत विद्यालयाच्या विद्यार्थानी केले आहे.

You cannot copy content of this page