काँग्रेसने बाजारपेठेत वाटले लाडू…

राहुल गांधी यांच्या शिक्षेस स्थगिती दिल्याने केला आनंद व्यक्त

मालवण (प्रतिनिधी)

‘मोदी’ आडनाव बदनामीच्या खटल्यात राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील न्यायालयाने दिलेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने स्थिगिती दिल्याने देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर मालवणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मालवण बाजारपेठेत नागरिकांना लाडू वाटून आनंद साजरा केला.

“राहुल गांधी जिंदाबाद… राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है…” अशा घोषणा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, बाळु अंधारी, श्रीकृष्ण तळवडेकर, सरदार ताजर, संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, दिलीप तळगावकर, लक्ष्मीकांत परुळेकर, सलाम मुजावर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page