बंटी पुरोहितच्या मागणीची नगरपालिका प्रशासनाने घेतली तात्काळ दखल…

चोवीस तासाच्या आत साफसफाईला केली सुरुवात; नागरिकांमधून समाधान व्यक्त…

सावंतवाडी ता.०५-: येथील मोती तलाव हे सावंतवाडी शहराच मुख्य ठिकाण असून त्यामध्ये कचरा साचून राहिल्याने शहरातील सौंदर्याला बाधा येत आहे, त्यामुळे तात्काळ साफसफाई करण्यात यावी अशी मागणी बंटी पुरोहित यांनी काल नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन द्वारे केली होती याची नगरपालिका प्रशासनाने तात्काळ दाखल घेऊन अखेर 24 तासाच्या आत मोती तलावाची साफसफाई सुरू करण्यात आली आहे त्यामुळे बंटी पुरोहित यांच्या मागणीला यश आले आहे.

तसेच शहरातील नागरिकांकडून देखील समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page