बस सेवा सुरळीत करा…

अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण:सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी दिले निवेदन

सावंतवाडी,ता.०५: सावंतवाडी कालिका मंदिर बस नियमित वेळेत सोडा तसेच अन्य बस मध्ये पास चालवून घेत नाहीत ही गंभीर बाब आहे.मुलांना खाली उतरवू नये मुलांकडे पैसे नसतात त्यामुळे वाहकाकडून त्रास दिला जाऊ नये. वेर्ले आणि शिरशींगे मुलांसाठी ५ च्या दरम्यान एखादी बस सोडावी. अनियमित बस मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे याबाबत ८ दिवसात सुधारणा न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थी पालकांसोबत उपोषणाचा इशारा निवेदनातून आगार व्यवस्थापकांना सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page