बांद्यात पर्यटकाला डुलकी लागून कारची वीज खांब्याला धडक….

शहरातील गडगेवाडी येथील घटना : परिसरातील घरातील विजेची उपकरणे जळून लाखो रुपयांचे नुकसान

*💫बांदा दि०४-:* इंदोर मध्यप्रदेश येथून गोव्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या आलिशान कारवरील चालकाचा झोपेत ताबा सुटल्याने कारची शहरातील गडगेवाडी येथील सुभेदार हॉटेल समोरील वीज खांबाला धडक बसली. या अपघातात वीज खांब कोसळल्याने परिसरातील दहाहुन अधिक घरातील विजेची उपकरणे जळून लाखो रुपयांची नुकसानी झाली. मोटारीच्या दर्शनी भागाचे देखील नुकसान झाले. या अपघातात सुदैवाने कारमधील प्रवासी बचवलेत. हा अपघात आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त कार उत्तरप्रदेश येथून गोव्यात जात होती. शहरातील गडगेवाडी येथे पहाटेच्या सुमारास चालकाला झोप अनावर झाल्याने कार रस्त्यालगत असलेल्या विजेच्या खांबाला धडकली. खांब कोसळल्याने विजेचा दाब वाढून या परिसरातील दहाहुन अधिक घरातील विजेची उपकरणे जळाली. सकाळी महावितरणचे सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर, कर्मचारी बापू देसाई, श्री. डावखुरे यांनी घटनास्थळी धाव घेत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

You cannot copy content of this page