Headlines

आमदार वैभव नाईक मुख्यमंत्री शिंदेच्या संपर्कात…

माजी खासदार निलेश राणेचा गौप्यस्फोट…

⚡कुडाळ ता.०३-: आमदार वैभव नाईक रिकाम टेकडेरंवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटतात. त्याचे पुरावे मी देवू शकतो असा गौप्यस्फोट भाजपाचे कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख व माजी खासदार निलेश राणे यांनी करीत आ. वैभव नाईक यांनी शिंदे की ठाकरे गटात आहेत ते जाहीर करावे, कोणाशी तरी प्रामाणिक रहावे असा टोला पत्रकार परिषदेत आ. नाईक यांना लगावला.
       
कुडाळ येथील पत्रकार परिषदेत बोलताना निलेश राणे यांनी आ. वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटले की, या विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्न, समस्या आहेत, त्या सोडविण्याकडे आ. नाईक यांचे लक्ष नाही. ते रिकाम टेकडे आहेत. त्यांच्याकडे वेळ आहे. त्यामुळे मतदारसंघातील कामे अर्धवट सोडून आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात ते डोकावून बघत आहेत. यापेक्षा नाईक यांनी नितेश राणे यांच्यापेक्षा एक रूपयाचा तरी निधी जास्त आणला का ते जाहीर करावे असे आवाहन नाईक यांना राणेंनी केले.
        या मतदार संघात आ. नाईक यांनी गेल्या नऊ वर्षात सर्व कामे अपूर्ण ठेवली मतदारसंघाची वाट लावली असून ही अपूर्ण कामे पूर्ण करायला पुढची पाच वर्षे जातील असे सांगत, 
        टीका करण्याची पात्रता वैभव नाईक यांची नाही. नाईक यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा संपल्या आहेत. विकास भाजप करेल हा जनतेला विश्वास आहे. त्यामुळे या मतदारसंघात निश्चितच बदल दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
  

You cannot copy content of this page