*💫वैभववाडी दि०३-:* करुळ जामदारवाडी येथील युवा शेतकरी सचिन सुभाष पाटील यांचा आदर्श पशुपालक पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने तालुक्यात सहा शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. सचिन पाटील हे उत्तम म्हैस पालन व्यवस्थापन करत आहेत. पशु सेवक म्हणून ते तालुक्यात कार्यरत आहेत. करुळ रासाई देवी दुग्ध उत्पादक संस्थेत तो सक्रिय सभासद आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल रासाई देवी संस्थेचे चेअरमन दिगंबर पाटील, व्हा. चेअरमन दत्ताराम साटम यांनी सचिन यांचे अभिनंदन केले. खरेदी-विक्री संघाचे चेअरमन महेश संसारे यांनी सचिन पाटील यांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी सचिव सिद्धेश रावराणे उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
सचिन पाटील यांचा आदर्श पशुपालक शेतकरी पुरस्काराने सन्मान…
