आरोग्य तपासणी, सत्कार करीत वैभववाडीत महसूल दिन साजरा…

आय ए एस करिश्मा नायर यांची उपस्थिती

वैभववाडी संजय शेळके
वैभववाडी तहसील कार्यालयात महसूल दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम व सर्व अधिकारी व कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी करिष्मा नायर, नायब तहसीलदार अनंत पिळणकर, नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, मंडल अधिकारी श्री. वैराग, श्री. पिळणकर, श्री. हावळ व अधिकारी उपस्थित होते.

महसूल विभागाने महसुली कामे वेळच्यावेळी पूर्ण करून त्यानूसार अभिलेख अद्यावत करणे, महसूली वसुलीचे उदिष्ट पार करणा – या अधिकारी व कर्मचा-यांचा सन्मान व महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरीता दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. त्यानुसार महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये उत्कृष्ट काम करणा – या व नवनवीन संकल्पना राबविणा -या उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी याना प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. वैभववाडी तालुक्यात या सप्ताहाचा शुभारंभ परि. उपविभागीय अधिकारी करिष्मा नायर ( भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसिलदार आवारात नायर यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, कर्मचारी वर्गासाठी उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. करण पाटील व त्यांचे सहकारी यांच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीरात कर्मचारी वर्गाची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी वनपाल प्रकाश पाटील, वनरक्षक संदीप कुमार कुंभार, विद्या जाधव, तात्या ढवण उपस्थित होते. यावेळी करिष्मा नायर यांच्या हस्ते कोतवाल, तलाठी, महसूल सहाय्यक, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून व नायब तहसीलदार याना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते .सूत्रसंचालन संदीप हांगे यानी केले.

You cannot copy content of this page