⚡बांदा ता.०१-: श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित मडुरा येथील व्ही.एन.नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत लोकमान्य पुण्यदिन साजरा करत वक्तृत्व स्पर्धा पार पडली. स्थानिक कमिटीचे सदस्य लक्ष्मण गवस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीती साळगावकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा पार पडली. लोकमान्य टिळकांचे कर्तृत्व व त्यांची कामगिरी सांगितली.
स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत होती. विजेत्यांमध्ये इयत्ता पहिलीतून प्रथम क्रमांक सार्थक वालावलकर, द्वितीय ज्ञानानंद रेडकर, तृतीय नॅथन फर्नांडिस. इयत्ता दुसरीमधून प्रथम क्रमांक कौशल मिस्त्री, द्वितीय मानस परब, तृतीय सुयश परब. इयत्ता तिसरी प्रथम क्रमांक तनिष्का महाले, द्वितीय लिजा मारणेकर, तृतीय क्रमांक विभागून मोहन जाधव व धनेश परब. तर इयत्ता चौथीमध्ये प्रथम क्रमांक यशवंत परब, द्वितीय स्टेला फर्नांडिस, तृतीय तनिषा राऊळ यांनी पटकावले.
यावेळी प्रशालेच्या सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर, वेलांकानी रॉड्रिग्ज उपस्थित होत्या. प्राची परब यांनी सूत्रसंचालन केले तर तेजस्वी गावडे यांनी आभार मानले.
