केर – भेकुर्लीचा श्रावणधारा महोत्सव शुक्रवारपासून

तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवास अनेक मान्यवर उपस्थित राहणार..

⚡दोडामार्ग.०१-: केर – भेकुर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या तीन दिवसीय श्रावणधारा महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवारी ( ता.४) होणार आहे. या सोहळ्याला अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती ग्रुप ग्रामपंचायत केर भेकुर्लीकडून देण्यात आली. केर आणि भेकुर्ली गावातील अनेकांचा सोहळ्यात सत्कार होणार आहे. अनेक कार्यक्रम तीन दिवस होणार आहेत.


शुक्रवारी सकाळी 11 वाजता श्रावणधारा महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अतिरिक्त अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ. उदय पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुहास गायकवाड, मृद व जलसंधारण अधिकारी आर. टी. धोत्रे, प्रभारी तहसीलदार संकेत यमगर, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आदी उपस्थित असतील. यावेळी रानभाज्या, औषधी वनस्पती, दुर्मिळ नाणी आदींचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.
शनिवारी आदर्श गाव समृद्ध शेतकरी संकल्प ग्रामसभा उद्घाटन सोहळा आदर्श गाव प्रकल्प उपसंचालक रविकांत गौतमी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्यास भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत, वनक्षेत्रपाल अरुप कन्नमवार, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, बांधकामचे उपविभागीय अभियंता अनिल बडे आदी उपस्थित असतील. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या फलकाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वा. संयुक्त दशावतारांचे ‘दक्षयज्ञ’ नाटक सादर होणार आहे.
रविवारी महिला महाग्रामसभा होईल. तिचे उद्घाटन विभागीय पोलिस अधीक्षक संध्या गावडे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यात यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक (चराठे) च्या अध्यक्ष अस्मिता भोसले, पोलिस निरीक्षक अरुण पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. श्रावणणारा महोत्सवाच्या समारोपाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत होईल. तर सायंकाळी 6 वा. ‘रथीसारथी संग्राम’ संयुक्त दशावतार नाटक होणार आहे.तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आणि भेकुर्ली ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page