वाहतूक ठप्प, तारा तुटल्या;दोन तासानंतवाहतूक सुरळीत
⚡दोडामार्ग ता.०१-: साटेली भेडशी ते खोक्रल मांगेली रस्त्यावरील बोडदे येथे सकाळीच रस्त्यात झाड पडल्याने बराच काळ तो मार्ग ठप्प झाला होता.शिवाय झाड पडल्याने विजेच्या ताराही तुटून पडल्या होत्या.सार्वजानिक बांधकाम विभागाने अकराच्या दरम्यान जेसीबीच्या साह्याने झाड हटवून रस्ता मोकळा केला.त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य केले.
साटेली भेडशी येथून खोक्रल, मांगेलीकडे जाण्यासाठी बोडदेमार्गे जाणे सोयीचे पडते.त्या रस्त्याने काही किलोमीटर अंतर कमी पडते.शिवाय त्याच मार्गाने एसटी गाड्याही ये जा करत असतात.त्याच मार्गावर बोडदे येथे झाड कोसळले आणि संपूर्ण रस्ता अडवला गेला.शिवाय झाड पडल्याने विजेच्या ताराही तुटून पडल्या.साहजिकच त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.पोलिस पाटील विलास शेटकर यांनी त्याबाबत आपत्ती विभागाला आणि विद्युत वितरणला कळवले.त्यांनतर रस्त्यात पडलेले झाड हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.
