मडुरा पंचक्रोशीतील वीज समस्या आठ दिवसांत सोडवा

उपोषणकर्त्यांची मागणी : अन्यथा 15 ऑगस्टला पुन्हा उपोषण छेडण्याचा इशारा

⚡बांदा ता.०१-: मडुरा पंचक्रोशीतील मडुरा, रोणापाल, पाडलोस, कास, सातोसे गावामध्ये गेले अनेक महिने विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळी कामांची आठवण उन्हाळ्यात करून देखील वीज वितरणने दुर्लक्ष करून ग्राहकांना आज अंधारात ठेवले आहे. जीर्ण विद्युत खांब, वाहिन्या, दोन महिन्यांमधील अंतर, खांबा मधील अंतर, लाईनवरची झाडी अशी अनेक कामे 10 ऑगस्टपर्यंत पूर्ण न केल्यास पुन्हा 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उपोषण छेडण्यात येणार असल्याचा इशारा मडुरा पंचक्रोशीतील वीज ग्राहकांनी दिला व तात्पुरते उपोषण स्थगित केले.


मडुरा ग्रामपंचायत येथे महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपोषण छेडले होते. यावेळी मडुरा ग्रामपंचायत माजी सदस्य प्रकाश वालावलकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप परब, भारतीय सुराज्य संस्थेचे अध्यक्ष दिनेश नाईक, मडुरा सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, माजी उपसरपंच विजय वालावलकर, सातोसे माजी सरपंच आबा धुरी, रोणापाल माजी सरपंच उदय देऊलकर, मडुरा सोसायटी चेअरमन ज्ञानेश्वर परब, सामाजिक कार्यकर्ते प्रितेश गवंडे, निगुडे माजी सरपंच समीर गावडे, मोहन गवस, अरुण पंडित, गौरव परब, प्रसाद मांजरेकर, जगन्नाथ पंडित, नकुळ परब, शुभम नाईक, दीपक राऊळ, आपा खरडे, रामा सावळ, विद्या नाईक, संतोष परब, भाई नाईक, कौशल नाईक, विवेक मडुरकर, उल्हास वालावलकर, संजय मेस्त्री, राजा परब, गोट्या परब, रामा परब, सुरेश धुरी, आनंद केरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page