⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला शहर सुंदर करायचे असल्यास सर्व प्रथम शहरातील रस्ते खड्डेमुक्त करणे आवश्यक असून वेंगुर्ला नगरपरिषद शहरातील भिंती रंगवत आहेत. मात्र, शहरातील रस्त्याकडे व रस्त्यावर पडलेल्या खड्ड¬ांकडे वेंगुर्ला नगरपरिषदेचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनिष सातार्डेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
शहरातील पडलेल्या खड्ड¬ांमुळे वाहनचालक व पादचारी लोकांना प्रचंड त्रास होत आहे. दाभोली नाका त एस.टी.स्टॅण्ड या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. शहर सुंदर करायचे असल्यास शहरातील रस्ते देखील खड्डेमुक्त करायला हवेत तरच पर्यटनाच्यादृष्टीने शहराचरा विकास होईल. दरम्यान, वेंगुर्ला नगरपरिषद शहरातील नागरिकांकडून वृक्षकर आकारते. परंतु, त्याच न.प.ला शहरात वृक्षारोपण करण्याचा विसर पडला आहे. मागील पर्यटन महोत्सवात कॅम्प स्टेडियम येथील बरीच झाडे तोडली होती. मात्र, चार वर्षे उलटूनही त्याठिकाणी एकही झाड लावलेले नाही. झाडे लावून न थांबता ती कशी जीवंत राहतील याची विशेष काळजी घ्या असे मतही अॅड.सातार्डेकर यांनी व्यक्त केले आहे.
