*रेवडी येथील भद्रकाली ग्रंथालयात मराठी राज्यभाषा गौरव दिन साजरा*

*💫मालवण दि.०३-:* रेवंडी येथील श्री भद्रकाली ग्रंथालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे साहित्यिक सदानंद कांबळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सदानंद कांबळी यांनी मराठी भाषेच्या समृद्धी विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषा गौरव गीताने करण्यात आली. यावेळी विजय कांबळी यांनी मराठी भाषा वाढीसाठी पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी बाबत विशेष मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे आपल्या मनोगतात सांगितले. रेवंडी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी मुलांचे गीत सादर केले. यावेळी अध्यक्ष युवराज कांबळी, सचिव जयराम कांबळी, नरेश करलकर, लक्ष्मण रेवंडकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल सुषमा मयेकर यांनी मेहनत घेतली. त्यांना कार्यक्रम प्रमुख कृतिका कांबळी, अंगणवाडी सेविका पराडकर, मदतनीस यांचे सहकार्य लाभले. गौरी गोवेकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page