शारदा विद्यालयातील मुलांना शालेय गणवेशाचे वितरण…

शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालकांच्या हस्ते वाटप_*

*💫सावंतवाडी दि.०३-:* मळगाव रस्तावाडा येथील शारदा विद्यालय मळगाव या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सोशल डिस्टनसिंगचे पालन करून शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालकांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, मनोहर राऊळ, गोपाळ नार्वेकर, अंजली खडपकर, साक्षी गावकर, जयशंभो सावंत, संतोष गावडे, सहदेव राऊळ, इतर पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्चपासून लॉकडाऊन असल्यामुळे शाळा व कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. पहिली ते चौथीबाबत अजूनही शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे जुलै महिन्यात करण्यात येणारे गणवेशाचे वाटप मुलांना करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक वर्गानुसार हे गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी कोरोना नियमावली व सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.

You cannot copy content of this page