मालवण ता.०१-: मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी खालची देवली येथील गुरुप्रसाद चव्हाण (बबलू चव्हाण) यांच्या शेत मळ्यात ‘बांधावरच्या शाळेचा’ अनुभव घेत शेती मधील विविध कामे करत शेतीची माहिती घेतली.
शेतीची माहिती केवळ अभ्यासक्रमापुरती न राहता धान्य उत्पादन करण्यासाठी शेतकरी किती कष्ट घेतो याची जाणीव व माहिती मुलांना व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुलतर्फे करण्यात आले होते. यासाठी खालची देवली येथील शेतकरी गुरुप्रसाद चव्हाण व कुटुंबियांचे यांचे सहकार्य लाभले. चव्हाण यांच्या शेतात विद्यार्थ्यांनी तरवा काढणे व लावणे याचे मार्गदर्शन घेत प्रात्यक्षिकही केले. तसेच शेती करण्याची पद्धती, अवजारे याविषयी माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत निशिकांत पराडकर, श्री.राणे, श्रीम.चौकेकर, श्रीम.सावंत, श्रीम.घाटवळ, श्रीम.करमळकर, श्रीम.ठाकूर आदी शिक्षक उपस्थित होते.
