⚡मालवण ता.०१-:
मालवण येथील दैवज्ञ हितवर्धक समाजाच्या वतीने नामदार नाना शंकरशेठ यांची १५८ वी पुण्यतिथी सोमवारी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने दैवज्ञ भवनच्या प्रांगणातील नामदार नाना शंकरशेठ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मालवणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नाना शंकरशेठ यांनी केलेले समाजकार्य हे सर्व समाजासाठी होते. त्यामुळे नानांच्या विषयी प्रलंबित मागण्या केंद्र, राज्य सरकारने लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन यावेळी अनिल मालवणकर यांनी केले. यावेळी अरविंद सराफ, रमेश आचरेकर, उत्तम पेडणेकर, सिद्धार्थ जामसांडेकर, गणेश प्रभुलकर, विनायक निवेकर, राजेश कुडाळकर, शैलेश बेलवलकर, रश्मी आचरेकर संजीवनी कुडाळकर, रिया कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक गजानन मालंडकर यांनी केले. तर विनोद रेवणकर यांनी आभार मानले.
