माडखोल व्ही पी कॉलेजचा तृतीय वर्षांचा निकाल जाहीर

⚡सावंतवाडी ता.३१-: शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल सावंतवाडी येथील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाचा ९५% निकाल लावून नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चे बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमाचे निकाल डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील अंतिम वर्षात नेहा तंबिटकर (८८. ०३) प्रथम, समीक्षा पवार (८२. ०८) व विनायक पडये (८२.०८) द्वितीय तर क्रांती गावकर (८२.०१) व धनश्री परब (८२.०१) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
दरवर्षी प्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा राखल्याबद्दल महाविद्यालयाचे तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे आधारस्तभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ वेदप्रकाश पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ.राहुल पाटील यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील शिंगाडे, तसेच महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख कु. मनाली वैद्य यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page