जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक दिन साजरा

⚡मालवण ता.३१-: मालवण येथील मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या कार्यक्रमात मुलांनी आपल्या पालकांचे पाय धुवून त्यांचे पूजन केले तसेच पालकांची ओवळणी करून त्यांचे आशीर्वादही घेतले.

मुलांना आपल्या संस्कृतीची जाणीव व्हावी तसेच पालक व पाल्य यांच्यामधील प्रेम वाढीस लागावे, यासाठी प्रशालेतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी आपल्या पालकांचे पाय धुवून पूजन करत ओवळणी केली. या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्व पालकांनीही गौरवोद्गार काढले. पालकांमधून शामसुंदर वाक्कर व प्रसाद वालावलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी सर्व वर्ग शिक्षकांनी ‘आई बाबांचे मुलास पत्र’ याचे वाचन केले. शिक्षिका सौ.करमळकर तसेच सौ. घाटवळ यांनी इतर शिक्षकांच्या मदतीने कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले होते. शिक्षक श्री. पराडकर व श्री. राणे यांनी सूत्रसंचालन केले.

You cannot copy content of this page