मळेवाड कोंडुरे ग्राम पंचायतीचा जनसुविधा, नागरी सुविधा योजनेत समावेश

विकास कामांसाठी स्वतंत्र निधी होणार प्राप्त:उपसरपंच हेमंत मराठे यांनी राजन तेली यांचे मानले आभार..

सावंतवाडी — ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेचा नागरी सुविधा योजनेमध्ये समावेश
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे या ग्रामपंचायती जन सुविधेतून नागरी सुविधा योजनेत नाव समाविष्ट करण्यात आल्याने आता या ग्रामपंचायतीला स्वतंत्र निधी उपलब्ध होणार आहे.या ग्रामपंचायत बरोबर सावंतवाडी तालुक्यातील आणखीन आठ ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे.नागरी सुविधांमध्ये ग्रामपंचायतचा समावेश केल्याबद्दल ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page