निष्क्रिय आमदाराला आता मतदारच २०२४ मध्ये कायमची जागा दाखविणार

भाजप नेते निलेश राणे यांचे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र

⚡कुडाळ ता३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्तीचे सावट असताना येथील आमदार वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसात मश्गूल होते. अशा निष्क्रिय आमदाराला आता मतदारच २०२४ मध्ये कायमची जागा दाखविणार आहेत. गेल्या नऊ वर्षांत त्यांचे आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी
गाजलेले एकतरी भाषण दाखवा विधानसभेत ३० सेकंदापेक्षा जास्त न बोलणारा आमदार विकास काय करणार? असा सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी आज पिंगुळी कार्यकर्ता मेळाव्यात करत ज्यांनी नारायण राणेंचा पराभव केला. त्याचा पराभव केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी भाजप पक्षात स्वगृही प्रवेश केला.
   भाजप पिंगुळी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने विकास कुडाळकरसह माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विष्णू धुरी आणि कार्यकर्ते यांचा प्रवेश कार्यक्रम पक्षाचे नेते दत्ता सामंत, सरपंच अजय आकेरकर, प्रदिप माने यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंगुळी येथील भवानी मंगल कार्यालय येथे झाला. यावेळी भाजप नेते दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, बंड्या सावंत, युवा नेते आनंद शिरवलकर, अँड. बंड्या मांडकुलकर, मोहन सावंत, विनायक राणे, सरपंच अजय आकेरकर, प्रदिप माने, मोहन रणसिंग, सागर रणसिंग, मंगेश मसके, शशांक पिंगुळकर, विजय कांबळी, रुपेश कानडे, पप्या तवटे, विजय दळवी, ममता राऊळ, साधना माड्ये, अश्विनी कांबळी, सोनाक्षी गावडे, राजवीर पाटील भाजप कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना नीलेश राणे म्हणाले की, विकास कुडाळकर तुम्ही परत आमच्या कुटुंबात आलात तुमचे स्वागत आहे. गेल्या अडीच वर्षात तुम्ही तिकडे कोरोना कालावधीत गेलात. आमच्या कुटुंबातील घटक गेल्याने त्यावेळी आम्हाला धक्का बसला. मात्र, आता आलात, पुन्हा तिकडे जाऊ नका. कोरोना लावून घेऊ नका, असे सूचित करून तुम्हाला अभिप्रेत असणारा पिंगुळी गावाचा सर्वागीण विकास आम्ही करणार आहोत. तुम्ही केलेल्या प्रवेशाबाबत तुमचा पक्षात मान सन्मान निश्चितच होणार आहे. माझी आणि येथील स्थानिक आमदार वैभव नाईक आमच्यात दुष्मनी अजिबात नाही. आमचा लढा आहे तो केवळ गेले नऊ महिने या आमदारांने लक्षवेधी काम केले नाही. सत्ता असताना एकही प्रकल्प आणला नाही. आता सत्ता नसताना काय विकासगंगा आणणार? खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वागीण विकास हा आमचे नेते नारायण राणे यांच्या माध्ममातून झाला असून आजही होत आहे. या आमदारांने कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाला १० वर्षे मागे नेले ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. राणेंच्या कारकिर्दीतील टाळंबा प्रकल्प सीवर्ल्ड अशा प्रकल्पना पुढे दिशा मिळाली नाही. एमआयडीसी ओसाड झाली असून एकूणच या मतदासंघाच्या सर्वागीण विकासासाठी आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी २०२४ ची विधानसभा निवडणूक महत्वाची आहे. त्याअगोदर होणाऱ्या जिल्हा परिषदेवर गेली २५ वर्षे नारायण राणेंच्या विचारांचा असणारा झेंडा सुध्दा यावेळी फडकावयाचा आहे. ज्यांनी राणेंचा पराभव केला त्याला २०२४ च्या निवडणुकीत तुमच्या सर्वांच्या जोरावर नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपचे हात बळकट करा असे आवाहन केले.
     प्रवेशकर्ते विकास कुडाळकर म्हणाले की, मी कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रवेश केला नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मला बरीच पदे दिली. त्यांच्यामुळे मी मोठा झालो माझ्याकडून
दिशा चुकली. ती सुधारण्याची संधी मला पुन्हा कुटुंबात घेऊन दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहे. यापुढे आपल्याला अभिप्रेत असणारे काम करेन.

२०२४ चे आमदार निलेश राणेच : दत्ता सामंत
  या मतदासंघाच्या विकासासाठी निलेश राणे यांना आमदार करणे हे आपले सर्वाचे काम आहे. राज्यात सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी आपण आतापासूनच कामाला लागूया. या मतदासंघात भाजप पक्षाचे उमेदवार हे निलेश राणेच असणार आहेत. माझ्यासह रणजित देसाई अन्य कोणीही निवडणूक लढविणार  नसल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले. सरपंच अजय आकेरकर, संजय वेंगुर्लेकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन मंगेश मस्के यांनी केले. प्रास्तविक दत्ता पाटील यांनी केले.

You cannot copy content of this page