युवा संदेश प्रतिष्ठानच्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

⚡कुडाळ ता.३०-: युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2023 चा बक्षीस वितरण समारंभ आज मराठा समाज हॉल कुडाळ येथे संपन्न झाला.

यावेळी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रत्येक इयत्तेतील पहिल्या ५० अशा २५० गुणवंत विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ६ वी व ७ वी प्रथम क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि २ री, ३ री, ४ थी च्या आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्राथमिक विभागातून अमोल गोसावी व माध्यमिक विभागातून सद्गुरु साटेलकर यांना युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी संग्राम देसाई (उपाध्यक्ष बार कौन्सिल महाराष्ट्र-गोवा), दीपलक्ष्मी पडते (माजी जि. प अध्यक्ष), नगरसेविका प्राजक्ता शिवलकर, संदेश उर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत (अध्यक्षा युवा संदेश प्रतिष्ठान), विनायक राणे (माजी नगराध्यक्ष कुडाळ), राजेश पडते, राकेश कांदे, विजय भोगटे, संजय सावंत, महेंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी प्रास्ताविक करताना युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  गोट्या सावंत यांनी पुढील वर्षापासून सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परीक्षा इंग्लिश मध्यामातही सुरू करणार असे सांगितले. तसेच यावर्षी ४ थी, ६ वी व ७ वी परिक्षेत प्रत्येक इयत्तेतील पहिल्या ५ अशा १५ गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून विमानाने इस्रो येथे भेटीसाठी नेण्याचे जाहीर केले. तसेच २ री व ३ री परीक्षेतील पहिल्या ५ अशा १० विद्यार्थ्याना गोवा येथील सायन्स सेंटरला भेटीसाठी नेण्याचे जाहीर केले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक करताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संग्राम देसाई यांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे आनंद झाला असून तरुणांनी संदेश सावंत यांच्याकडून प्रेरणा घेऊन सामजिक व शैक्षणिक कार्य करावे असे सांगितले. तसेच प्रतिष्ठानच्या उपक्रमांना शुभेच्छा देताना पुढे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
You cannot copy content of this page