सेवांगणच्या साने गुरुजी वाचन मंदिरात १ रोजी ग्रंथप्रदर्शन

⚡मालवण ता.२९-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर यांच्या वतीने लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवीन खरेदी केलेल्या पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकार अमित खोत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गुरूवार दि. ३ ऑगस्ट पर्यंत ग्रंथालयाच्या वेळेत ग्रंथप्रदर्शन ग्रंथप्रेमींसाठी सुरू राहणार आहे. तरी ग्रंथ प्रेमीनी ग्रंथप्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन साने गुरुजी वाचन मंदिर चे अध्यक्ष रुजारिओ पिंटो यांनी केले आहे.

You cannot copy content of this page