आमजनतेला त्रास देणा-यांना धडा शिकवा!-शैलेश परब

⚡वेंगुर्ला ता.२९-: माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब शेतकरी, विद्यार्थी नैसर्गिक आपत्तीत ओढावलेल्या जनतेला अत्यावश्यक ती मदत करा. अशा स्वरुपात केलेल्या आवाहनानुसार सर्वसामान्यांची गरज ओळखून त्याप्रमाणे कार्यक्रम राबविले जात आहेत. वेंगुर्ला तालुक्यात जे कार्यक्रम होत आहेत त्याची संकल्पना तालुकाप्रमुख यशवंत परब यांची आहे. शिवसेना ही सर्वसामान्य लोकांची, सर्वसामान्य जनतेचे हित जोपासणारी आहे. म्हणूनच गेल्या ५ टर्ममध्ये या मतदार संघाने शिवसेनेच्याच उमेदवारांला निवडून दिले आहे. मात्र यावेळी गद्दारांना व महागाईने आमजनतेला त्रास देणा-यांना धडा शिकवून ठाकरे शिवसेनेला सत्तेवर आणा असे प्रतिपादन शैलेश परब यांनी केले.


माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह अंतर्गत तुळस जिल्हा परिषद मतदार संघातील होडावडे येथील मराठे मंगल कार्यालयात, शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा, गरजू गरीब शेतक-यांना खत वाटप व शिष्यवृत्ती पटकाविणा-या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वाटप तसेच पुरात सापडलेल्या युवकांस वाचविणा-या मातोंड गावातील १२ युवकांचा सत्कार अशा सर्वसामान्यांशी निगडीत कार्यक्रमाचे ठाकरे शिवसेनेतर्फे आयोजन करण्यात आले होते. उद्धव ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संफ प्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून आयोजित केलेला हा कार्यक्रम शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ संफप्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या पमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बाळा गावडे, तालुका प्रमुख यशवंत परब, तालुका संफ प्रमुख भालचंद्र चिपकर, उपतालुका प्रमुख तुकाराम परब, शहर प्रमुख अजित राऊळ, वजराट गावचे विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, वायंगणी सरपंच सुमन कामत, सावंतवाडीतील आबा सावंत, युवासेनेचे हिमांशू परब, महिला संघटीका सुकन्या नरसुले, कोमल सरमळकर आदी उपस्थित होते. यावेळी तुळस, जिल्हा परिषद मतदार संघातील तुळस, होडावडा, वजराट या गावातील २५० शेतक-यांना मोफत खत पिशव्यांचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे तुळस येथील युवक मातोंड कालावल येथे पुराच्या पाण्यात अडकला त्यास स्वतःचे पाणांची बाजी लावून वाचवण्यासाठी यशस्वी पयत्न केलेल्या १२ युवकांचा या कार्यक्रमात खास सत्कार केला. तसेच शिष्यवृत्ती पटकाविलेल्या कर्तव्य बांदिवडेकर, वेदिका वजराटकर साबाजी पडवेकर, पूर्वा परब, अश्विन सोन्सुरकर, हर्षल मेस्त्री, सोहम परब, यश गावडे, आर्यन सावंत, वेदांत पालयेकर, अजित पेडणेकर या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page