धोंडी पास्ते यांचे प्रतिपादन:डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयातकारगिल विजय दिन उत्साहात साजरा..
⚡बांदा ता.२९-: जसे देशाची सीमा सुरक्षित ठेवण्याचे काम सैनिक करतात. तसे प्रत्येक नागरिकाने आप-आपल्या क्षेत्रात देशाशी इमान राखून प्रामाणिक कार्य केले तरी ती खुप मोठी देशसेवा ठरेल. विद्यार्थ्यांनी देशसेवेचा ध्यास धरुन सैन्यात जावे. चिकाटीने भरतीला जावे, स्पर्धा परीक्षा द्याव्यात. सकारात्मक जगावे. यशस्वी व्हावे मात्र आपण आपल्या देशाचे देणे लागतो हे कधीच विसरु नये असे प्रतिपादन निवृत्त सैन्य अधिकारी तथा वेतोरेचे विद्यमान तलाठी धोंडी पास्ते यांनी बांदा खेमराज प्रशालेत केले.
बांदा येथिल खेमराज मेमोरियल प्रशाला आणि डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयात २४ वा कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन श्री पास्ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी सैनिक शंकर बाबू भाईप, निलेश सावंत-पटेकर, मुख्याध्यापिका माधवी सावंत, कऩिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रदीप देसाई, पर्यवेक्षक नंदकिशोर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
कँप्टन शंकर भाईप यांनी कारगिल विजयाचा इतिहास उलगडला. पाकिस्तानने कशाप्रकारे विश्वासघात करुन ही लढाई भारतावर लादली आणि भारताच्या शूर सैनिकांनी त्यांचे मनसुबे कसे धुळीस मिळवले ते सांगितले. निलेश पटेकर यांनीही आपले सैन्यातले अनुभव सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तिन गटात निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील विजेत्यांना यावेळी गौरविण्यात आले. स्पर्धांचे निकाल पुढील प्रमाणे.
गट पहिला 5 ते 7 (वक्तृत्व स्पर्धा) प्रथम तीन क्रमांकानुसार. सान्वी सचिन देसाई, निधि सुनील राठोड, शमिका अमोघ सिधये.
निबंध स्पर्धा- भिकाजी राजेंद्र देसाई, अस्मी अभिजीत देसाई, आदित्य अंकुश ठाकूर. आठवी ते दहावी गट – (वक्तृत्व स्पर्धा)- प्रज्ञा तुषार मोर्ये, चिन्मय शांताराम असनकर, चिन्मयी सूर्यकांत चव्हाण. (निबंधस्पर्धा)- नंदिनी आनंद चव्हाण, साक्षी निवृत्ती शिंदे, आचल अजय आरोसकर. अकरावी ते बारावी गट (वक्तृत्व स्पर्धा)- रजनी ज्ञानेश्वर नाईक, आर्या अजय देसाई, रिद्धी महेश तळगावकर. (निबंध स्पर्धा)- हर्षिता जयवंत धुरी, कृपाली शशिकांत पंडित, राधिका विठ्ठल धुरी.
या प्रसंगी या सर्व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग ग्रूप बांदा चे अध्यक्ष अक्षय मयेकर, ‘सकाळ’चे बांदा प्रतिनिधी निलेश मोरजकर यांना राष्ट्रीय पातळीवरचा भास्कर भूषण पुरस्कार मिळाल्याने तसेच पत्रकार आशुतोष भांगले, प्रवीण परब, मयूर चराटकर, यशवंत माधव यांचासुद्धा आदर्शवत समाजकार्यासाठी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण सुतार यांनी केले. प्रास्ताविक अनिकेत सावंत यांनी केले. तर आभार नंदकिशोर नाईक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गंगाधर काळे, आप्पा राऊळ, सुमेधा सावळ, सुर्यकांत सांगेलकर, प्रमोद सावंत रसिका भिसे यांनी परिश्रम घेतले.
फोटो:-
बांदा खेमराज प्रशालेत कारगिल विजय दिन सोहऴ्या बोलताना माजी सैनिक धोंडी पास्ते. सोबत शंकर भाईप, निलेश सावंत पटेकर व अन्य.
फोटो :-
बांदा खेमराज प्रशालेत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाट्न करताना मान्यवर. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
