⚡मालवण ता.२८-: मालवण शहरातील बसस्थानक मागील बौद्धवाडीतील धोकादायक बनलेले दोन विद्युत खांब अखेर वीज महावितरण कंपनीच्या माध्यमातून बदलण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक मनसेचे पदाधिकारी तथागत मालवणकर यांनी वीज कंपनी आणि नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले होते.
मालवण शहरातील बसस्थानक मागील बौद्धवाडी येथील दोन विद्युत खांब अत्यंत धोकादायक बनले होते. पावसात, सोसाट्याच्या वाऱ्यात हे खांब कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने मनसेचे पदाधिकारी तथागत मालवणकर यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानुसार वीज कंपनीच्या माध्यमातून ते धोकादायक बनलेले विद्युत खांब हटवून नवीन बसविण्याची कार्यवाही करण्यात आली. मनसेच्या पाठपुराव्याने हे काम मार्गी लागल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
