⚡कणकवली ता.२८-: युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्यावतीने दरवर्षी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या वायक्तीमत्वाचा सन्मान केला जातो.त्यानुसार सन २०२३ या वर्षी प्राथमिक विभाग अमोल तुकाराम गोसावी(जि.प.प्राथ.शाळा पांग्रड रेडेतळ) , तालुका कुडाळ
माध्यमिक विभाग
सद्गुरु नारायण साटेलकर (एस. एल. देसाई विद्यालय पाट) यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्यावतीने दरवर्षी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील प्राथमिक शिक्षकांना युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित असून युवा संदेश प्रतिष्ठानच्या तज्ञ कमिटी मार्फत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता शालेय विद्यार्थी,पालक, शालेय परिसरातील ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून आदर्श शिक्षकांची निवड करण्यात येते.
सन २०२३ यावर्षांसाठी निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये प्राथमिक विभाग अमोल तुकाराम गोसावी(जि.प.प्राथ.शाळा पांग्रड रेडेतळ) , तालुका कुडाळ
माध्यमिक विभाग
सद्गुरु नारायण साटेलकर(
एस एल देसाई विद्यालय पाट) यांची निवड करण्यात आली आहे.
सदर शिक्षकांना रविवार ३० जुलै २०२३ रोजी मराठा समाज हॉल कुडाळ येथे होणार्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा बक्षिस वितरण कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्याचे हे ७ वे वर्ष असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कारमूर्तींचे संजना संदेश सावंत( माजी जि .प. अध्यक्ष सिंधुदुर्ग आणि संदेश उर्फ गोट्या सावंत संस्थापक अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
