इन्सुली उपकेंद्र येथे पॅनल मध्ये मध्यरात्री स्फोट झाल्याने बांदा शहरासह परिसरातील वीज पुरवठा ठप्प…

युद्धापातळीवर काम सुरु:दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होणार; वीज कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट

बांदा/प्रतिनिधी
महावितरणच्या इन्सुली उपकेंद्र येथे पॅनल व सीटी मध्ये मध्यरात्री स्फोट झाल्याने बांदा शहरासह परिसरातील वीज पुरवठा मध्यरात्री ३ वाजलेपासून ठप्प झाला आहे. पॅनल दुरुस्तीचे काम युद्धापातळीवर सुरु असून दुपारपर्यंत टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याचे बांदा महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

महावितरणचे उपकेंद्र इन्सुली येथे असून बांदा शहराला 33/11 केव्ही लाईनमधून वीज पुरवठा करण्यात येतो. मध्यरात्री पॅनेल मध्ये स्फोट झाल्याने वीज पुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार असल्याने सर्व ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page