अनंत उचगावकर यांची माहीती;
तात्काळ दाखला देण्याच्या पालिका प्रशासनास सुचना
⚡सावंतवाडी ता.२७-:
येथील नेत्र रुग्णालयासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला देण्यास पालिका प्रशासनाकडून चालढकलपणा होत असल्याने नॅब रुग्णालयाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाच्या विरोधात उद्या छेडण्यात येणाऱ्या जन आक्रोश आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ परवानगी देण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबतची माहिती नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी दिली
