माजी सरपंच भगवान गावडे यांचाही वाढदिवस केला साजरा:विद्यमान सरपंच गुणाजी गावडे यांचा पुढाकार
⚡सावंतवाडी ता.२७-: येथील वेत्ये ग्रामपंचायत कार्यालय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी सरपंच श्री भगवान गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये श्री कलेश्वर विद्या मंदीर शाळा व अंगणवाडी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
दरम्यान सरपंच श्री गुणाजी गावडे यांच्या हस्ते वेत्ये गावातील 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीम शितल खांबल उपसरपंच श्री महेश गावडे सदस्य श्री भगवान गावडे सदस्य श्री रमेश गावकर श्री शरद जाधव श्री संतोष गावडे उपस्तिथ होते
