उद्या आझाद मैदान येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे आंदोलन

आशा व गट प्रवर्तक होणार सहभागी

देवगड ता.२६-:
राष्ट्रीय आरोग्य अभियान ही योजना जनतेच्या हितासाठी महत्त्वाचे आहे तेव्हा त्यांची आर्थिक तरतूद वाढवावी यामध्ये काम करणाऱ्या अशा गटप्रवर्तक यांना सेवेत कायम करावे त्यांना वेतनश्रेणी लागू करावी या मागण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २६ जुलै २०२३ रोजी मुंबईत आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येत आहे त्यामध्ये राज्यातील आशा व गटप्रवर्तक कर्मचारी सहभागी होणार आहेत. देवगड तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक या आंदोलनात त आपल्या मागण्या घेऊन सहभागी असून सहभागी असल्याचे निवेदन देवगड तहसीलदार यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कस युनियन संलग्न देवगड शाखेच्या वतीने बुधवारी सकाळी देण्यात आले यावेळी अध्यक्ष विद्या विनायक सावंत,सचिव नीलिमा नागेश सारंग, सदस्य प्रज्ञा प्रकाश धोपटे, विशाखा विवेक अनभवणे ,विशाखा विनायक बांदिवडेकर ,मनाली महेंद्र ईलावडेकर व अन्य उपस्थित होत्या. यावेळी देवगड नायब तहसीलदार यांच्याकडे मणिपूर येथील महिलांचे विवस्त्र धिंड व सामूहिक बलात्काराच्या घटनेचा जळजळीत निषेध व्यक्त करणारे निवेदने अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन शाखा देवगडच्या वतीने देण्यात आले.

You cannot copy content of this page