काँग्रेसच्या सांगेलकरांचा सामाजिक कार्यात पुन्हा हात…

निरुखेत झाड हटवून रस्ता पुर्ववत

सावंतवाडी : कोलगांव निरुखेवाडी येथे रस्त्यावर झाड पडल्याने बंद झालेली वाहतूक झाड बाजूला करत पुर्ववत करण्यात आली या कार्यात पुन्हा एकदा काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर उतरल्याने त्यांचे सामाजिक कार्यातील सहभाग पुन्हा दिसून आला.


निरुखेवाडी येथे महामार्गावर झाड पडल्याने वाहतुकीचा मार्ग बंद झाला.
याबाबतची माहिती श्री सांगेलकर यांना मिळताच त्यांनी जेसीबी मशीनसह तेथे धाव घेतली. शिवाय हातात कोयता घेऊन झाड तोडून हटवण्यास मदत केली. या कार्यात सामाजिक बांधिलकीची टिमही सहभागी झाली होती. याशिवाय
पोलीस कर्मचारी महेश अरवारी, जगदीश दूधवाडकर यांनी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. तसेच ग्रामस्थ बाबा शिंदे, मोहन ठाकूर व विजय बहादूर यांनीही रस्त्यावरील झाड हटवण्याच्या कामी मदत केली.

You cannot copy content of this page