Headlines

आयडीयल इंग्लिश स्कूल येथे “श्रावणधारा”सुगम संगीत स्पर्धा

⚡कणकवली ता.२६-: आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे व डॉ.राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने , विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यात कलात्मक विकास व्हावा या उद्देशाने व दर्जेदार व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी जिल्हास्तरीय ” श्रावणधारा”सुगम संगीत स्पर्धा 2023″ चे आयोजन केले आहे,


स्पर्धा इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वी व इयत्ता ९वी ते १२ वी व खुला गट अशा तीन गटात असेल,तिन्ही गटांना भावगीत , भक्तीगीत, नाट्यगीत, गज़ल यापैकी एक ५ मिनिटे गाणे सादर करायचे आहे,
इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वी गट
प्रथम – रु.1500/- व आकर्षक चषक ,द्वितीय – रु.1000/- आकर्षक चषक ,तृतीय – रु.800/- आकर्षक चषक
उत्तेजनार्थ प्रमाणपत्र
इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी गट
प्रथम – रु.2000/- व आकर्षक चषक ,द्वितीय- रु.1500/- व आकर्षक चषक तृतीय – रु.1000/- आकर्षक चषक
उत्तेजनार्थ- प्रमाणपत्र
खुला गट प्रथम – रु.2500/- व आकर्षक चषक द्वितीय – रु.2000/- व आकर्षक चषक
तृतीय- रु.1500/- व आकर्षक चषक उत्तेजनार्थ- प्रमाणपत्र
सदर स्पर्धा ही एकल गायन स्पर्धा आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे 16/ 8/2023 पर्यंत पोहचतील अशी पाठवावी ,स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही.नाव नोंदणीसाठी
9527995001,9890520888
8380053641,9890267138
प्रथम फेरी – रविवार 20/08/2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 .अंतिम फेरी – शनिवार
02/09/2023. रोजी होणार असून आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे येथे ही स्पर्धा होईल.

You cannot copy content of this page