आठही महिला तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर

महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारे यांची माहिती

⚡सावंतवाडी ता.२६-: जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी दिली

यात सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षपदी सपना वेंगुर्लेकर, वेंगुर्ला दिशा पालक, दोडामार्ग बिना नाईक, मालवण ममता तळेगावकर,कुडाळ सोनिया मुंज, वैभववाडी प्रांजली जाधव देवगड कल्पना गावकर, व कणकवली अमृता मालवणकर असे निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

दरम्यान याबाबत प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वालाके यांनी ही निवड केली असल्याचे वंजारी यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page