बांदा/प्रतिनिधी
बांदा आळवाडी येथे तेरेखोल नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला बांद्यातील युवक राजा खान, शिवसेनेचे अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष रियाज खान, बाबा खान व मिलिंद सावंत यांनी बाहेर काढत बांदा पोलिसांच्या ताब्यात दिले. हि घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.
. सदर तरुणाचे आर्थिक देवघेव व्यवहार असल्याने पैसे न मिळाल्याने नैराश्येतून त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. दुपारी अचानक हा तरुण धावत तेरेखोल नदीपात्राकडे गेला. याची माहिती मिळताच तेथेच दुकानात असलेले रियाज खान, राजा खान हे धावत त्या तरुणाजवळ पोहोचले. त्याला लागलीच पुलावरून ताब्यात घेत खाली खेचले. त्यांना पकडून मच्छिमार्केट येथे आणण्यात आले. तो घाबरलेल्या स्थितीत होता. त्याची माहिती घेत त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तरुणांच्या धाडसी वृत्तीचे कौतुक होत आहे.
